
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अजय चव्हाण
( मागील दोन वर्ष मोठा त्रास झाला यावर्षी निदान नीट पाऊस पडेल या आशेवर आम्ही आहोत पण अजून पेरणी झाली नाही मग लावणी कधी होईल बी- बियाणे आणून ठेवली आहे देवा आता पाऊस लवकर पडू दे अशी प्रार्थना शेतकरी करीत आहोत”- बंडु राठोड (शेतकरी))
माहुर तालुक्यात अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
दिवसेंदिवस वाढते तापमान व सायंकाळी भरून येणारे काळेकुट्ट ढग पण पाऊस मात्र पडायला तयार नाही. अद्यापही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरण्यांची तयारी करून बसलेल्या शेतकऱ्याला चिंता सतावत आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात
नेहमीच पावसाचे आगमन होत असते. शेतकरी पावसाळ्यापूर्वीच मशागतीची कामे आटोपून लागणार्या बी-वियाण्यांची
तजवीज या काळात करून ठेवत असतो. पण ता.19 जून उजाडला तरी पावसाचा अजून पत्ता नाही. त्यामुळे या वर्षाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरणीला उशीर
झाल्यास लावणीला देखील उशीर होणार
याचा विपरीत परिणाम पिकांवर होऊ शकतो याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
माहुर तालुक्यातील तालुक्यातील वानोळा परिसरात पावसाने पाठ फिरवल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. पाऊस आणखीनच लांबला तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
पावसाचे आगमन कधी होणार याकडे मात्र शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
“अर्थव्यवस्थेला गती”
दमदार पावसाच्या जोरावरच खरीप हंगामा तील पिकेही जोमदार येतात. उत्पादनही चांगले होते.
पर्यायाने जनावरानां चारा आणि अन्न धान्यांची मुबलक उपलब्धता होते. शेतकरी चांगले उत्पादन निघाल्यास अतिरिक्त उत्पादन विक्रीला काढतो. त्यामुळे बाजारात खरेदी-विक्रीची साखळी तयार होते. त्याला उत्पादनाचीजोड मिळते
अलीकडे झपाट्याने वाढलेल्या फळबागा
तही मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात.
शेतीचे उत्पन्न चांगले मिळाले तरच शेतकरी ट्रॅक्टर, शेती अवजारे, बी-बियाणे, खते
फवारणीचे पंप, पाणी उपसा करण्याचे पंप आदींची खरेदीकरतो. त्याद्वारे शेतीची प्रगती करण्याचा प्रयत्न करतो. यासगळ्या मुळे अर्थव्यवस्थेला गती मिळते. पिके चांगली आल्यास शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. मात्र पावसाअभावी शेतकऱ्याचे नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.