दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेनेच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात शिवसेनेचा ५६ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व नंतर ध्वजारोहण करण्यात आला.
यावेळी जेष्ठ शिवसैनिक गणेशराव कुंटेवार, शिवसेनेचे लोहा तालुका प्रमुख सुरेश पाटील हिलाल, शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन कराडे ( गुंठे), तालुका संघटक नागोराव पाटील उमरेकर, कंधार शिवसेना तालुकाप्रमुख परमेश्वर पाटील जाधव, लोहा -कंधार विधानसभा संघटक मिलिंद पाटील पवार, किसान सेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर युवासेनेचे तालुका प्रमुख धनंजय पाटील बोरगावकर, दत्तराव पाटील सुगावकर, नारायण कोकाटे, अमर टेलर, विनायक पाटील भरकडे कौडगावकर, हनमंत पाटील जाधव , विश्वंभर पाटील हंबर्डे, दादाराव पाटील शिंदे, दतराज पाटील जाधव, संतोष पाटील कोकाटे, आदी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे म्हणाले की, लोहा व कंधार तालुक्यात शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत यात मोफत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर , नागरिकांना कमी दरात चष्मे वाटप , लोहा -कंधार तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे .
तसेच येणाऱ्या काळात शिवसेनेच्या वतीने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती, तसेच कंधार नगर परिषदेची निवडणूक मोठ्या जोमाने लढवून शिवसेनेची संख्या बळ वाढविणार आहोत. तसेच आमचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रमुख आनंदराव जाधव यांनी या भागात बरेच वर्ष काम केले आहे त्यांनी शपथ खाली की लोहा – कंधार चा शिवसेनेचा आमदार झाल्याशिवाय जाणार नाही यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार असुन शिवसेना पक्ष लोहा -कंधार तालुक्यात बळकटी मिळण्यासाठी सर्व प्रयत्नशिल आहोत असे बाळासाहेब पाटील कराळे म्हणाले.