दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
यावेळी योगाला प्रोत्साहन देण्यासाठी शाहिरी पोवाड्याचे देखील आयोजन
20 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या एक दिवस आगोदर कळंबा तर्फ ठाणे येथे जिल्हा महिला व बालविकास विभाग, कळंबा ग्रामपंचायत आणि केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने योगावर आधारीत कार्यशाळेचे आणि योग आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
योगाला प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी शाहिरी पोवाडा कला मंच कोल्हापूर, प्रोत्साहनपर पोवाड्याचे सादरीकरण करतील.
नेहरू युवा केंद्र संघटना जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये योग आधारित प्रात्यक्षिक स्पर्धा 17,18,19 जून रोजी आयोजित करत आहे व या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याचे संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी सर्व तालुक्याच्या ठिकाणी स्पर्धेत सहभागी होता येईल. यासाठी गणेश भोसले तथा नेहरू युवा केंद्राच्या समन्वयक पूजा सैनी यांच्याशी संपर्क साधता येईल.
येत्या 21 जून रोजी असणाऱ्या 8 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर तसेच नेहरू युवा केंद्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
21 जून रोजी सकाळी सात वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे कॉमन योग प्रोटॉकल वर आधारित योग प्रात्यक्षिके करण्यात येतील व नेहरू युवा केंद्र संघटन मार्फत झालेल्या तालुका स्तरावरील योग प्रात्यक्षिक आधारित स्पर्धांचे बक्षीस वितरण देखील करण्यात येईल.
जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने सर्व शाळांना आंतरराष्ट्रीय योग दिनी योगाभ्यास करण्याविषयी देखील आवाहन करण्यात आलेले आहे