
दैनिक चालु वार्ता
जिल्हा प्रतिनिधी
प्रा मारुती बुद्रुक पाटील
अहमदपूर येथील जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक प्रभाकर नागनाथ आप्पा पुणे यांचे दिनांक 20 रोज गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने वयाच्या ऐंशीव्या वर्षी दुःखद निधन झाले .
त्यांच्या पश्चात पत्नी दोन ,मुले एक मुलगी ,सुना ,नातू, परतवनडे असा मोठा परिवार असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका सरचिटणीस राजकुमार पुणे यांचे वडील होते.
दिनांक 21 रोजी सायंकाळी चार वाजता लिंगायत स्मशानभूमी मध्ये शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.