
दैनिक चालू वार्ता परतूर प्रतिनिधी- नामदेव तौर
परतूर:शुक्रवारी रोजी इयत्ता दहावी चा निकाल लागला असुन गोळेगाव येथील श्री.ज्ञानेश्वर डुकरे यांचा मुलगा चि.कृष्णा ज्ञानेश्वर डुकरे यांने 98% गुण मिळवून परभणी येथील ज्ञानतीर्थ विद्यालयातुन प्रथम आला आहे.
तर गोळेगाव येथील पोलीस पाटील श्री.बबन डोळस यांची मुलगी कु.रिया बबन डोळस ने 90% गुण मिळवून कस्तुरबा गांधी विद्यालय आंबा येथुन सर्वप्रथम आली आहे.
त्याबद्दल त्यांचे कौतुक व शाब्बासकी ची थाप म्हणुन गांवकरी व जि.प.शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.मुपडे सर , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.राजेभाऊ घोरड, ग्रामपंचायत सदस्य , शिक्षकवृंद आणि गांवकरी उपस्थित होते.