
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- बाजीराव गायकवाड
दाताळा:-श्री छत्रपती शिवाजी ग्राम विकास मंडळ दाताळा संचलित,श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल दाताळा ता. कंधार या शाळेचा एस.एस.सी.बोर्ड परीक्षा मार्च 2022 चा निकाल 100% लागला आहे.शाळेतून एस.एस.सी.परिक्षेला 23 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 13 विद्यार्थी विशेष प्रावीण्य, 09 विद्यार्थी पहिल्या ग्रेड मध्ये तर एक विद्यार्थी दुसऱ्या ग्रेड मध्ये पास झाला आहे. यामध्ये फुलवळे अविष्कार उत्तम यास 451 गुण(90.10%) मिळाले आहेत, भुरे नागेश व्यंकटी यास 449गुण(89.90%), कदम ऋतुजा राजेश हिला 426गुण(85.20%) मिळाले आहेत. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.नामदेवराव भिमराव पाटील शिंदे दाताळेकर, संस्थेचे सचिव प्रा.श्री शिवाजीराव नामदेवराव शिंदे ,संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.श्री किशनराव गोविंदराव पाटील शिंदे , मुख्याध्यापक श्री संजय नामदेवराव पाटील शिंदे,सहशिक्षक श्री विळेगावे बी.जी.,श्री बनसोडे डि.बी.,श्री एकंबे पी.एन.,श्री ब्याळे जी.के.,सेवक श्री काकनाळे एन.एस.,श्री सय्यद वाय.एस.यानी सर्व एस.एस.सी.उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.