
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- बाजीराव गायकवाड
नांदेड:-रेस्ट हाऊस नांदेड येथे आम आदमी पार्टीची जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली या वेळी आम आदमी पार्टी चे प्रदेशाध्यक्ष रंगा दादा राचुरे यांनी सांगितले की, नांदेड जिल्ह्यात आम आदमी पार्टी
जिल्हा , पंचायत समिती, आणि नगर पालिका व नांदेड महानगरपालिका निवडणूका लढवणार असल्याचे सांगितले .
आम आदमी पार्टी ने दिल्ली नंतर पंजाब लक्ष केले होते,पंजाब हस्तगत केल्या नंतर आत महाराष्ट्रात लक्ष घातले आहे.याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात, नांदेड जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, आणि नगरपालिका निवडणूका लढवणार आहेत.
नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्या निमित्ताने रेस्ट हाऊस येथे आढावा बैठक घेण्यात आली त्या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगा दादा राचुरे यांनी घोषित केले.
या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष प्रा.देविदास शिंदे यांनी केले. तसेच मराठवाडा संघटन मंत्री सुग्रीव मुंडे ,जिल्हा सचिव डॉ. अवधुत पवार, संघटन मंत्री दिलीप जोंधळे, शहर सचिव डॉ. कादरी,युवा जिल्हाधक्ष अजित बनसोडे, फाउंडर मेम्बर नरेंद्रसिंघ ग्रंथी यांची मार्गदर्शन पर भाषणे झाली.
हदगाव तालुका अधक्ष गंगासागर ,मुखेड तालुका अध्यक्ष विठ्ठलराव इंगळे,किनवट तालुका अध्यक्ष भाऊसिंग राठोड यांनी आपल्या कार्याचा लेखाजोखा मांडला.
या कार्यक्रमाला जिल्हा संयोजक ज्ञानेश्वर कदम, सचिव डॉ. अवधुत पवार, शहर संयोजक प्रा. देविदास शिंदे, सचिव डॉ. कादरी,संघटक दिलीप जोंधळे, युवा अध्यक्ष अजित बनसोडे, फाउंडेर मेम्बर नरेंद्रसिंघ ग्रंथी, सह संयोजक अंकुश खानसोळे असे अनेक कार्येकर्ते उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम कापुरे यांनी केले व आभार अजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.