
दैनिक चालू वार्ता परतूर प्रतिनिधी -नामदेव तौर
परतूर :परतूर येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परिक्षेत घवघवीत यश संपादन केले असून शाळेचा निकाल १००% लागला आहे
याविषयी सविस्तर वृत्त असे कि मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परिक्षेत ३६ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती ३६ पैकी ३६विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयातून राऊत सत्यम तातेराव ८२.८० गुण घेऊन प्रथम तर बिडवे मयूरी ८२.८०% द्वितीय. टेकाळे अनिशा नारायण,८२.२०% तृतीय
राठोड पृथ्वीराज नवनाथ ८१.४०%गुण मिळून घवघवीत यश संपादन केले आहे शाळेचे अध्यक्ष श्री महेशभाऊ आकात यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या..