
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : अमेरिकेच्या समर्थनामुळे भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक बिघडत आहेत. असा आरोप भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांनी केल आहे.
पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिरेक्यांना भडकावणे आणि शस्त्रे पुरवणे आणि खोऱ्यातील शांतता बिघडवणे या सर्वा बाबींवर जयशंकर यांनी भाष्य केले.
अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी गुरुवारी पाकिस्तानला अमेरिकेचा भागीदार म्हटले होते. “पाकिस्तान हा आमचा भागीदार आहे आणि आम्ही ती भागीदारी पुढे नेण्यासाठी मार्ग शोधू. आमच्या हितासाठी आणि आमच्या परस्परांच्या हितासाठी एकमेकांना पाठिंबा देऊ. असे वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी केले.