
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : जगातील अमेरिकेचा दबदबा संपला असल्याची टीका रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केली आहे. अमेरिकेच्या आमिषाला बळी पडून मित्र देशांनी रशियाच्या विरोधात कोणतीही पावले उचलल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
अमेरिका स्वतःला ‘मॅसेंजर ऑल गॉड’ समजत असून, प्रत्यक्षात मात्र अमेरिका आपल्या देशांशी गुलामाप्रमाणे वागत असल्याचे पुतिन म्हणाले.
एका कार्यक्रमात बोलताना पुतिन म्हणाले, अमेरिका आता पहिल्यासारखा शक्तिशाली देश राहिलेला नाही. आपल्या मित्र देशांना गुलामासारखी वागणूक देत आहे हे खेदजनक आहे.
अमेरिकेचा दबदबा कमी झाला असल्याचे आता मित्र देशांनी समजावून घ्यावे. तुम्ही इतरांना नेहमीच कमजोर आणि गुलाम समजत असाल तर एक दिवस त्याची किंमत चुकवावीच लागते आणि हेच आता अमेरिकेबाबत होत आहे. यावेळी पुतिन यांनी एकदाही रशिया आणि युक्रेन युद्धाबाबत भाष्य केले नाही.