
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली :राजकारणात एकमेकांच्या विरोधात कितीही वेळा समोरासमोर आले असले तरी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना भेट पाठवली आहे. ही भेट पाठवून त्यांनी ११ वर्षांची परंपरा कायम राखली आहे.
ममता बॅनर्जी यांनी सर्व केंद्रीय मंत्र्यांना आंबे पाठवले आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह १८ केंद्रीय मंत्र्यांना आंबे भेट म्हणून पाठवले आहे