
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
किनवट : तालुक्यातील बोधडी (बुद्रूक ) येथील अंध विद्यालयात २१ जून “जागतिक संगीत दिन ” निमित्त शास्त्रीय सुगम गायनाचा चोवीस तासांचा अखंड स्वरयज्ञ संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कलाप्रेमी रसिकांनी या कार्यक्रमास बहुसंख्येने हजेरी लावावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ललित कलेतील सर्वश्रेष्ठ कला संगीत. आदिमानवाने निसर्गातील पशुपक्षांच्या मंजुळ नादापासून स्वरांची, वाद्यांची निर्मिती केली. अशा ह्या निसर्गरम्य आदिवासी अतिदुर्गम किनवट तालुक्यात संगीताचा प्रसार, प्रचार करावा म्हणून ” जागतिक संगीत दिन ” व “जागतिक योग दिन ” निमित्य अंधांच्या जीवनात नवी दृष्टी देणाऱ्या आदिवासी कला शिक्षण संस्था बोधडी ( बु ) संचलित अंध विद्यालय बोधडी (बु) येथे सोमवार (दि. २० जून ) रोजी रात्री १२:०० नंतर म्हणजे मंगळवार (दि.२१ जून ) रोजी शून्य वाजता पासून ते ( दि . २१ जून ) रात्री १२:०० पर्यंत “शास्त्रीय सुगम गायनाचा चोवीस तासांचा अखंड स्वरयज्ञ संगीत कार्यक्रम” स्मृतिशेष सूरमणी पंडित वसंतराव शिरभाते गुरुजी यांच्या सर्व शिष्य परिवारांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
सर्व संगीत रसिकांनी या अनोख्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अंध विद्यालय संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.