
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
कोरेगांव वाठार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तीन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून वाठार पोलिसांनी १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करुन तीन संशयितांना गजाआड केले. याबाबत पोलिस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन दि.१२ जून रोजी रात्री दोनच्या सुमारांस हासेवाडी गावच्या हद्दीतून निळा रंगाचा ट्रॅक्टर चोरीला गेला असल्यांची तक्रार वाठार पोलीस ठाण्यांत दाखल होती. त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यांचा तपास वाठार पोलिसांनी शिताफीने तपास करीत चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरच्या ठिकाणापासून ते ललगुण, डिस्कळ, पुसेगांव फलटण, शिंगणापूर दहिवडी परिसरांतील सर्व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व मोबाईल लोकेशनच्या आधारे मिळालेल्या माहितीच्या आधारे वाठार पोलिसांना तीन संशयितांना पर्यंत पोचता आले. संशयितांना अटक करुन त्यांच्याकडूंन चोरीला गेलेला ट्रॅक्टर व दुचाकी तसेच चोरुन आणलेली एटिंगा कार असा एकूण १० लाखांचा मुद्देमाल वाठार पोलिसांना हस्तगत करण्यांत यश आले. संशयितांनी विविध गुन्हे केल्यांची कबुली पोलिसांना दिली त्यामध्ये एक वर्षापूर्वी चोरलेली एटिंगा कार व दुचाकीचा समावेश आहे या चोरुन आणलेल्या कारचा वापर चोरी करण्यासांठी ताब्यांत घेण्यांत आलेले संशयित करीत होते. बनावट नंबर लावून ते त्या कारचा वापर करीत होते. संशयिताकडूंन दहिवडी, फलटण शहर ग्रामीण या परिसरांतील मोटरसायकल चोरी केल्यांचा संशय असून त्यांच्याकडूंन आणखी गुन्हे उघडकीस येण्यांची शक्यता आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय बोंबले पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर यांच्यासह सहाय्यक फौजदार भोसले, हवालदार केंजळ पोलीस नाईक तुषार आडके, गणेश इथापे आदीं पोलिस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. वाठार पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल परिसरांतून पोलिसांचे कौतुक होत आहे