
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
रामतीर्थ पोलिस स्टेशनपासून एक किलोमीटरवर घडली घटना
देगलूर: नांदेड देगलूर राज्य महामार्गावर कुंचेली फाट्याजवळ रविवार दि. १९ जून रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास चोरट्यांनी बोलेरो मॅक्स जीप अडवून लूटमार केली यात प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दागिने व मोबाईल लंपास करण्यात आले.
खानापूर येथील जमीलखान पठाण हे कुटुंबातील सदस्यांसमवेत नरसीकडून खानापूरकडे बोलेरो मॅक्स एम.एच.२६. एल. १०३५ क्रमांकाच्या जीपने जात असताना कुंचेली फाट्याजवळ रोडच्या कडेला जॅक पडलेला निदर्शनास आला, तो घेण्यासाठी गाडी थांबवून गेले असता रोडच्याकडेला झुडपात चार चोरटे
चोरट्यांनी अचानक त्यांना पकडून रॉडनी मारहाण केली. तसेच इतर सदस्य यांना मारहाण करत त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल व नगदी रक्कम असा एकूण १ लाख ६६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करत पोबारा केला.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. जमीलखान पठाण यांच्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलिसांनी गुरन ९६/२२ भादंवि कलम ३९४ / ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय