
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
देगलूर:जि .प.निवडणुकीची खानापूर सर्कलमध्ये जोरदार चर्चा.
हाणेगाव सर्कलमधून काँग्रेसचे विद्यमान तालुकाध्यक्ष प्रितम देशमुख हाणेगावकर, मरखेल सर्कलमधून मागील निवडणुकीतील उमेदवार डॉ.धुमाळे, करडखेड सर्कलमधून पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर, शहापूर सर्कलमधून नुकतेच सेवानिवृत्त झालेले ग्रेडर गंगारेड्डी कोटगिरे शहापूरकर
खानापूर सर्कलमधून श्वेताताई बस्वराज पाटील वन्नाळीकर या सर्वांची उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.परंतु हे सर्व सुटणार्या आरक्षणावर अंवलंबून असले तरी, तालूक्यातील बडे लोकप्रतिनिधि आतापासूनच तयारी जोमात करत असल्याचे चिञ पाहावयास मिळत आहे.
एकीकडे राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी थांबली,लागलीच राज्यातील विधानपरीषेदच्या निवडणुकीनिमित्त राज्यात राजकीय वातावरण गरम आहे. दरम्याण दुसरीकडे देगलूरमधील नगरपालिकेच्या प्रभागरचना व आरक्षण सोडत जाहीर झालेली असताना नगरपालिकेच्या निवडणुकीचा रंग मोठ्या रंगाने रंगात आले असताना, देगलूरमधील ग्रामीण भागात माञ जि.प.निवडणुकीची लगीनघाई मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहे.
नगरपालिका निवडणुकी नंतर लागलीच जि.प.पं.स.निवडणुकीचा बार उडेल, असा अंदाज काही नेत्यांनी पुरेपुर बांधले असून, त्यामुळे सर्कलनिहाय प्रभावी व प्रतीभावंत नेत्यांची काॅग्रेस जिल्हा श्रेष्ठीसह देगलूरमधील नेत्यांनी सर्कलनिहाय उमेदवार निश्चितच केले असल्याचे मोठी चर्चा तालूक्यातील ग्रामीण भागात पाहावयास मिळत असून, खानापूर सर्कलमधुन वन्नाळी येथील शासकीय नोकरी सोडून सामाजिक कार्य करणाऱ्या काॅग्रेस कार्यकर्त्या
श्वेताताई बस्वराज पाटील वन्नाळीकर यांचे नाव सध्या सर्वात आघाडीवर असून त्यांच्या स्पर्धेत काॅग्रेसमधुन सध्यातरी दूरदूर पर्यत कोणत्याही नावाची चर्चा ऐकावयास मिळत नसल्याचे दिसत आहे.
दरम्याण श्वेताताई बस्वराज पाटील वन्नाळीकर हे खानापूर सर्कमधील गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे काॅग्रेस पक्षाच्या माध्यमातून नेहमी पाहवयास मिळते. विशेष करुन तालूक्यातील
उद्योग,कला,शिक्षण, क्रीडा,सहकार,समाजकारण,शेती,साहित्य क्षेञात श्वेताताई बस्वराज पाटील वन्नाळीकर यांचे योगदान असून खानापूर सर्कलमधील प्रत्येक गावातील समस्या सोडवण्यासाठी जनहीतासाठी ते सदैव दक्ष असल्याचे पाहावयास मिळते. कोरोना काळात जनतेची त्यांनी केलेली सेवा तालुक्यातील सर्वांना सर्वश्रूत आहेच. प्रत्येक गावातील मतदारांशी त्यांचे संबंध अतिशय सलोख्याचे आहेत. प्रत्येक गावातील लोकांच्या सुखदुःखात त्या सहभागी होतात . मतदार संघातील प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असते .दरम्याण सर्वसमावेशक सेक्युलर विचारसरणीचे श्वेताताई बस्वराज पाटील वन्नाळीकर हे देगलूर काॅग्रेस बुथ कमिटीच्या प्रमुख अध्यक्षा असून ते नेहमी पक्ष कार्यात सक्रीय असल्याचे दिसतात. देगलूर तालुक्यातील प्रत्येक गावात बुथ कमिटी तयार करण्याचे प्रमुख काम त्यांनी केले आहे. काँग्रेस पक्ष डिजिटल सदस्यता नोंदणी कार्यात नेहमी अग्रेसर होते. देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत देगलूर-बिलोली तालुक्यातील एकूण नऊ जिल्हा परिषद सर्कल मध्ये सर्वाधिक मताधिक्य खानापूर सर्कल ने दिले आहे.यामध्ये श्वेताताई बस्वराज पाटील वन्नाळीकर यांची कामगिरी व मेहनत प्रशंसनीय होती असं तेथील लोक म्हणत आहेत. कोणतीही आणि कुणाचीही निवडणूक असो ते पक्ष आदेशाप्रमाणे अतिशय मेहनत करतात. पक्षातील स्थानिक पासून ते वरिष्ठ पर्यंत च्या सर्वच नेत्यासोबत त्यांचे संबंध अतिशय चांगले व सलोख्याचे आहेत. काँग्रेस पक्ष सत्तेत असो वा नसो नेहमी अडचणीच्या काळात पक्षाची एक निष्ठेने त्यांनी काम केले आहे. त्यामुळे आगामी होणार्या जि.प.खानापूर सर्कलमधून श्वेताताई बस्वराज पाटील वन्नाळीकर यांच नाव सध्या जोमात चर्चेत असल्याने, जर उपरोक्त गट हे खुल्या प्रवर्गासाठी/ सर्वसाधारणासाठी निघाल्यास काॅग्रेस पक्षाकडून व सर्कलमधील गावनिहाय काॅग्रेस कार्यकर्त्यांनकडून व पदाधिकारी यांच्याकडून श्वेताताई बस्वराज पाटील वन्नाळीकर यांच्याच नावाची उमेदवारी निश्चित मानली जात असल्याची चर्चा देगलूरमधील काॅग्रेस पक्षासह खानापूर सर्कलमधील नागरीकांतून ऐकावयास मिळत आहे.
चौकट…
———
हाणेगाव सर्कलमधून काँग्रेसचे विद्यमान तालुकाध्यक्ष प्रितम देशमुख हाणेगावकर, मरखेल सर्कलमधून मागील निवडणुकीतील उमेदवार डॉ.धुमाळे, करडखेड सर्कलमधून पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर, शहापूर सर्कलमधून नुकतेच सेवानिवृत्त झालेले ग्रेडर गंगारेड्डी कोटगिरे शहापूरकर
खानापूर सर्कलमधून श्वेताताई बस्वराज पाटील वन्नाळीकर या सर्वांची उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.परंतु हे सर्व सुटणार्या आरक्षणावर अंवलंबून असले तरी, तालूक्यातील बडे लोकप्रतिनिधि आतापासूनच तयारी जोमात करत असल्याचे चिञ पाहावयास मिळत आहे.