
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी :अरुण भोई
राजेगाव ता.दौंड येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणेच्या वतीने खरीप हंगामातील मका पिकावर कार्यशाळेचे आयोजन राजेगाव येथील खैरे वस्तीवरील हनुमान मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या शेती शाळेत महिलांनी मोठा सहभाग घेतला होता यामध्ये मका पिकासाठी जमिनीची निवड ,वाण निवड,उगवणक्षमता प्रात्यक्षिक इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन कृषिसेविका तेजश्री ढवळे यांनी केले यावेळी महिलांना सखोल मार्गदर्शन केली आणि मका पिकाचे उत्पन्न कसे अधिक वाढवता येईल याची माहिती दिली.
ढवळे यांनी शेती विषय असणाऱ्या विविध समस्यां आणि उत्पन्न अधिक कसे घेता येईल कोणत्या हंगामात कोणती पिके घेतली पाहिजे या विषय मार्गदर्शन केले