
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- अरुण भोई
पुणे:- पुणे येथील भारत माता अभ्यासिका, पर्वती पायथा, पर्वती पुणे ०९ या ठिकाणी भोई फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यातील भोई व त्याच्या तत्सम जमातींच्या हक्क मागणी संदर्भात भारतीय निती आयोग, राज्य मागासवर्गीय आयोग, महाराष्ट्र सरकार यांच्याकडे जाण्या संदर्भातील एक बैठक लावली होती यावेळी ईधाते आयोगाचे मा अध्यक्ष, भारतीय निती आयोगातील जबाबदार व्यक्तीमत्व मा दादासाहेब ईधाते तसेच राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य माजी न्यायमूर्ती मा चंद्रलालाजी मेश्राम साहेब यांनी आपली हजेरी लावली आणि राज्यातील भोई व त्याच्या तत्सम जमाती घटकाच्या मांगणी संदर्भात चर्चा करून पुढील कार्यवाही बाबत मार्गदर्शन केले यावेळी भोई फाऊंडेशनचे अध्यक्ष Dr. मिलिंद भोई, जेष्ठ समाजसेवक अेके भोई, मा गोकुळजी मवारे, विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषदेचे उपाध्यक्ष श्री अर्जुन भोई मुंबई, अँड.श्रीकांतजी पाटील, प्रा. मुरलीधर भानारकर, डॉ विष्णू बावणे, डॉ युवराज लांबोळे, डॉ पंकज बावणे, श्रीमती नलिनी कारळे, सौ शोभाताई भोकरे, सौ योगेश्वरी मवारे, श्रीमती शिला वंजारे, सौ परिणीता तारु, हभप रामकिसनजी परदेशी, श्री गणेश बावणे, श्री अरुण गिरधर भोई, श्री प्रकाश रामोळे, श्री वि बा भोई, श्री प्रदिप फुलपगारे, श्री किशोरपुदाले, अँड. मुकुंद यदमळ, श्री अरुण भोई अंतुर्लीकर, श्री बाळासाहेब गवते, श्री अनिल घुमे, श्री प्रदिप फुलपगारे, श्री अविनाश मल्लाव… यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते