
दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनिधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड– येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नवीन कौठा , माणिक नगर नांदेड या शाळेने मार्च 2022 च्या दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले असून शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम टिकून ठेवली आहे शाळेचा एकूण निकाल 94.75 % एवढा लागला असून या निकालात 17 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम कु. स्नेहजा मुंडे या विद्यार्थिनीने 97.00 % गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे तर द्वितीय स्थानी बाजी संकेत बाचेवार यांनी 96.20 % क्रमांक पटकावला आहे आणि तृतीय स्थानी कु. टेकाळे कावेरी या विद्यार्थिनी 95.60 % कु.सूर्यवंशी अंजली 95.20 कु.सूर्यवंशी रुचिका 94.60 , डाकुलगे शिवशंकर 83.80 % , कु.बुटले मानसी 92.80 % , कु.वसमतकर मनसा 92.00 % , कु.प्रिया सूर्यवंशी91.80 % , कु.कदम द्रोपदा 91. 80 % , कु. तिर्थे स्नेहल 91.60 % , सरपाते आशिष 91.60 % , कु.कदम शिवश्री 91.40 % , कु.सोनकांबळे निकिता 91.00 % , कराळे सोहम 90.80 % , पवार आदित्य 90.80 % , बिरदे सिद्धार्थ 90.60 % या वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहेत.
दहावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे संस्थापक तथा संचालक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माजी खासदार तथा आमदार माननीय भाई डॉ.केशवरावजी धोंडगे साहेब व संस्थेचे सचिव ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माजी आमदार मा. भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब , तसेच संस्थेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य मा. डॉ.पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे साहेब , संस्थेचे सहसचिव मा.अँड. मुक्तेश्वररावजी केशवरावजी धोंडगे साहेब , संस्था कार्यकारणी संचालक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य तथा शालेय समिती उपाध्यक्ष नांदेडचे प्रा. वैजनाथराव कुरुडे , शालेय समिती सदस्य मधुकरराव कुरुडे तसेच शालेय समिती सदस्य मा.सुर्यकांत कावळे व नवनिर्वाचित शालेय समिती सदस्य मा.इंन्द्रजीत बुरपल्ले , शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा.सुधीर भाऊ कुरुडे , श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड चे उपप्राचार्य माननीय परशुराम येसलवाड , शाळेचे उपमुख्याध्यापक मा.देविदास कदम शाळेचे पर्यवेक्षक श्री सदानंद नळगे , श्री शिवराज पवळे , ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक प्रा.माधव ब्याळे , प्रा.घोरबांड मुरलीधर , वर्ग दहावी चे वर्गशिक्षक श्री व्यंकट उपासे , श्री योगेश भांगे , श्री राम गायकवाड , श्री दत्तात्रय देवकते , श्री विजय कळणे , तसेच श्री शिवाजी विद्यालय नवीन कौठा /माणिक नगर नांदेड च्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.