
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
विकृत बदनामीकारक लिखाण करणाऱ्या जेम्स लेन या लेखकाच्या विरुध्द इंदापूर तालुक्यातील शिवप्रेमीनीं सन 2013 मध्ये आंदोलन केले होते व इंदापूर पोलिसांनी अनेक शिवभक्तांवर खटला दाखल केला होता. सकल मराठा समाजाच्या वतीने अँड. सचिन चौधरी यांना कायदेशीर प्रक्रीये ची जबाबदारी देण्यात आली त्या प्रमाणे अनेक कार्यकर्त्यांचे विनाशुल्क जामीन त्यांनी करून दिले व पुढे खटल्याचे कामकाज ही विनामूल्य पाहिले दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रका प्रमाणे खटला मागे घेण्यात यावा या करिता संबंधित खात्याकडे पाठपुरावा देखील केला, सरते शेवटी शिवभक्तांच्या प्रयत्नांना यश आले व महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रका प्रमाणे शिवप्रेमीं च्या विरुद्ध चा खटला महाराष्ट्र शासनाने रद्द केला व ती बाब ,अँड. सचिन चौधरी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली व शिवभक्त मावळ्यांच्या लढ्याला यश मिळाले ,या सर्व प्रक्रिये मध्ये मराठा समाजाने दिलेली जबाबदारी अँड. सचिन चौधरी यांनी अतिशय प्रामाणिक पणे पार पाडली त्याबद्दल अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने त्यांना स्वराज्यरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी शंभुराजे युवा क्रांती प्रदेशाध्यक्ष सुनील बाप्पा मोरे माजी नगराध्यक्ष कृष्णाजी ताटे, गटनेते कैलास कदम, अखिल भारतीय मराठा सेवा संघ प्रदेश उपाध्यक्ष पवन घोगरे ,गोरख शिंदे, मारुती मारकड आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पवार यांनी केले ,तर कार्यक्रमाचे आभार अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी मानले. यावेळी रमेश पाटील, नगरसेवक अमर गाडे, अनिकेत वाघ ,अतुल शेटे पाटील, माजी सभापती महिंद्र रेडके, कर्मयोगी कारखान्याचे संचालक रवींद्र सरडे ,माजी नगराध्यक्षा अलका ताटे , ॲड, रणजित बाबर, रणजीत चौधरी, अवधूत डोंगरे ,भगवान महाडिक, सुभाष बोंगाणे, हरि जाधव, प्रशांत सरडे, वसंत फलफले, प्रशांत गलांडे पाटील, प्रशांत उबरे, महेश बोधले, राम आसबे, बाप्पू धुमाळ,सचिन सावंत, रमेश भोसले, राजू चव्हाण, मनोज मोरे, आबासाहेब राखुंडे, रेवन गव्हाणे, तुषार उबाळे, प्रीतम लावंड ,दिपराज वीर, सागर आसबे ,नितीन चौधरी,सुरज वीर, गणेश भांडवलकर, विठ्ठल महाडिक, सचिन शिरसाठ, प्रशांत पाटील,राजेंद्र पवार ,सचिन गोळे, विशाल मिगडे, चंद्रकांत शेरकर, ज्ञानेश्वर फलफले व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजयकुमार फलफले यांनी केले.