
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : ठरल्याप्रमाणे सोमवारी २० जून रोजी मुंबईत विधान परिषदेची निवडणूक पार पडली. भाजप व मविआ मध्ये अत्यंत चुरस पहायला मिळाली. या निवडणुकीसाठी भाजपाचे दोन आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे प्रकृती साथ देत नसतानाही मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले व त्यांनी मतदानाही केले. राज्यसभा निवडणुकीत भाजपने तिसऱ्या जागेवर विजय मिळवल्यानंतर, या दोन्ही लढवय्या आमदारांमुळेच भाजपला यश मिळाले, असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.
आमदार जगताप सकाळी ७ वा घरून निघाले व खास रुग्णवाहिकेतून मुंबईत आले होते
तर आमदार टिळक सकाळी साडेसहा वाजता त्यांच्या निवासस्थानातून मुंबईसाठी रवाना झाल्या होत्या. फडणवीस व गिरीश महाजन यांनी या दोन्ही लढवय्ये आमदारांचे स्वागत करून त्यांचे आभार मानले. देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी मुंबईत भाजप आमदारांची बैठक झाली, तेव्हा या दोन्ही आमदारांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला होता.