
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मानव म्हटलं कि अनेक सद्गुण आणि अनेक दुर्गुण याच भांडार दैनंदिन जीवनात ज्या गुणांचा प्रभाव पडेल ते गुण वृद्धींगत होतात मग ते सद्गुण असो कि दुर्गुण . आणि दैनंदिन जीवनात प्रभाव हा सहज आणि सर्वसाधारण घटनांमधून होत असतो . आणि तयाचे रूपांतर शेवटी विशाल अशा वट वृक्षा मध्ये होत असते .याच पद्धतीने आजकाल आळस हा दुर्गुण दिवसेंदिवस आपले पाय हाळुहळु पसरवून आपला पाया कसा मजबूत करत आहे .व आपल्याला कळुन सुद्धा आपण दुर्लक्ष करत आहोत असाच एक सहज दृष्टीक्षेपास पडलेला सहज आणि अगदी लहान परंतु विलक्षण प्रसंग .
आज सकाळी साधारणतः साडे सात ची वेळ मी नेहमी प्रमाणे घराच्या बाजूला असणाऱ्या अगदी छोटं पण माझं रूटीन फिरणं पुर्ण होईल या पद्धतीच्या नगरपालिकेच्या छोटयखानी असणार्या मैदानावर औपचारिकता म्हणून फिरण्यासाठी गेलेलो . मैदान कसल ते नगरपालिकेच्या आराखड्यानुसार आपला थातुरमातुर ओपन पेस सोडलेला आणि नंतर नगरपालिकेच्या प्रशासनाने कंपाऊंड करून गल्ली मधील लहान मुलांना खेळण्यासाठी तात्पुरती सोय केलेल ते छोटंसं मैदान मी पण आपल सकाळी सकाळी औपचारिकता म्हणून फिरण्यासाठी आलेलो . औपचारिकता यासाठी कि आपल्या संस्कृती नुसार व्यायाम किंवा फिरणं हे सूर्योदया अगोदरच असलं पाहिजे . परंतु हल्ली आळशीपणा खुप वाढलाय मी सुद्धा त्यापैकी एक मी आपलं मैदानावर फिरत होतो. फिरत असताना आजुबाजूला उगच काय चाललंय म्हणून लक्ष देण्याची भारतीय सवय त्याला मी आपवाद कसा असणार आणि याच दरम्यान आश्चर्य वाटेल असाच घटनाक्रम घडला. मैदानाच्या बाजूला एक तीन मजली बिल्डिंग आहे . तसं आजुबाजूला अनेक घर आहेत .दुध वाले फळभाजी वाले सकाळी सकाळी पेपर वाटप करणारे पण मोटरसायकल वर येरझाऱ्या मारत होते . आणि तेवढ्यात माझ एका विलक्षण घटनेवर लक्ष गेलं त्या तीन मजली इमारतीच्या खाली मोटरसायकलवरून पेपर टाकणारा मुलगा आला . तिस-या मजल्यावर रहणारे गृहस्थ यांनी गॅलरी मध्ये येऊन चक्क दोरी थेट खाली सोडली आणि त्या मुलाने त्या दोरीला पेपर बांधला आणि ती दोरी वर खेचली गेली व क्षणार्धात पेपर त्यांच्या पर्यंत पोहचला . अगदी लहान पाणी गावाकडे असताना विहीर मधुन पाणी शेंगदाण्याची पद्धत अगदी जवळून पाहिलेली नव्हे स्वतः अनेक वेळा गुरा ढोरांना पाणी पाजण्यासाठी व घरी पाणी आणण्यासाठी शेंगदाण्याचा योग हा आलेलाच परंतु नजीकच्या दहा पंधरा वर्षा पासून शहरात आल्यापासून हि पद्धत संपली असं वाटलं होतं पण आज प्रथम शहरात पाणी शेंगदाण्या ऐवजी पेपर शेंदला हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होत.आता आपल्याला प्रश्न पडण साहजिकच आहे या मध्ये विशेष असं काय घडलं किंवा वेगळं असं काय आहे .या मध्ये वेगळे पणा हाच आहे कि आपण कुठं चाललो आहोत पेपर टाकणारा मुलगा किंवा ज्यांना पेपर पाहिजे होता यांना चालत जाण्यासाठी अंतर होतं ते फार फार दोन मजल्याच्या जिन्याच म्हणजे फार काही अंतर नव्हतं पण ते नेमकं चालयाच कोणी व कशासाठी आता तिस-या मजल्यावर रहणारे गृहस्थ हे एकटे राहत नव्हते पत्नी दोन मुल एकंदरीत चार माणसं घरात रहणारी त्यापैकी कोणीही खाली येऊ शकलं असतं पण तसं घडलं नाही.गावाकडे आजही एखादी वस्तू दुकानी वरून आणायची असेल तर मी जाणार म्हणून घरातील मुलांची भांडण लागतात . आणि घरची मुलं शाळेत वगैरे गेलेली असतील तर क्षणाचा विलंब न लावता शेजारची मुलं अगदी पळत जाऊन वस्तू घेऊन येतात म्हणजे कमालीची तत्परता असते . आणि आळस शुन्य असतो . आणि याठिकाणी तर मग प्रश्न पडतो कि ती लहान मुलं पण खाली आली नाही आणि आई वडील पण आले नाही .तर याच मुख्य कारण आहे प्रत्येक व्यक्ती मध्ये तंत्रज्ञान युगातील धावत्या जागांमध्ये वाढणारी आळशी वृत्ती आणि हिच वृत्ती मानवी व्यवस्थेचं खुप मोठ नुकसान भविष्यात करेल या मध्ये यत्किंचितही शंका नाही म्हणून आपण सजग होण्याची आवश्यकता आहे . आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण आपली आळशी मनोवृत्ती प्रकट न करता अगदी छोट्या छोट्या किंवा मोठ्या बाबी सुद्धा सहजगत्या आळशी वृत्ती ला खतपाणी न घालता पुर्ण केल्या पाहिजेत. आपण असंच काहीसं या पद्धतीने वागत राहिलो तर मग मात्र येणार काळ कठिण असेल.
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301