
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा : – जय महाराष्ट्र विद्यालय पांगरी येथील उज्वल यशाची परंपरा कायम राखत इयत्ता दहावीचा निकाल १००% लागला असुन विशेष प्राविण्यमध्ये ३५ विद्यार्थी , व्दितीय श्रेणीत ९ विद्यार्थी , व तृतीय श्रेणीत दोन विद्यार्थी पास झाले असुन शाळेचा निकाल हा १००% लागला आहे.
जय महाराष्ट्र विद्यालयात कु. गीता केशव चांदणे , 92% प्रथम क्रमांक , कु. प्रियंका रामदास बुद्रुक 91 % कु. रोहिणी एकनाथ जामगे 91% असे मार्क घेऊन विद्यार्थी व विद्यार्थिनी पास झाले असुन शाळेचा १०० % निकाल लागला असुन या निकाबाबत लोहा – कंधार मतदारसंघाचे माजी आ रोहिदास रावजी चव्हाण , सचिव सचिन शेषेराव काळे पंचायत समिती सदस्य नवनाथ बापु चव्हाण , पंचायत समितीचे माजी सभापती खुशाल पा पांगरीकर , गावचे उपसरपंच माधव पा बुद्रुक , मारोतराव बुद्रुक शाळेचे मुख्याध्यापक एम बी पवार , सर्व शिक्षक व कर्मचारी पालकवर्ग , गावातील नागरिक , परीसरातील पांगरी बोरगाव शिवणी , भांद्रा येथील पालकांनी पण या निकालाचे तोंडभरून कौतुक करत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जय महाराष्ट्र विद्यालयात पांगरी दर्जेदार शिक्षण शिक्षणमय वातावरण , व विद्यार्थ्यांना अतिशय मेहनतीने मार्गदर्शन करणारे शिक्षकवृंद , या मुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावत असुन आसपासच्या संपूर्ण खेड्यात नव्हे तर परीसरात पण शाळेचे नाव लौकीक झाले असुन जास्तीत जास्त विद्यार्थी प्रवेश घेऊन शिक्षण पुर्ण करत जास्तीत जास्त गुण मार्क घेऊन उत्तीर्ण होत असुन शाळेचा निकाल पण सतत १००% लागलेला पहावयास मिळत आहे.