
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
भाजपाचे लोहा तालुकाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांनी यांनी भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या एकाधिकारशाही आव्हान देत लोहा तालुक्यातून त्यांची हिटलरशाही मोडीत काढण्यासाठी “तुटेंगे मगर झुंकेगे नहीं” असा स्वाभिमानी बाणा दाखवत थेट मुंबई गाठून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे मेघदूत बंगल्यात काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर त्यांचे लोहा येथे दि. २० रोजी आगमन होताच माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शरद पाटील पवार यांचा लोहयात विविध ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.
लोहा बस स्थानकात पत्रकारांच्या वतीने शरद पाटील पवार यांचे शाल पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक प्र.नबीसाब शेख, पत्रकार डी.एन.कांबळे,
पत्रकार शेख मुरतुजा, पत्रकार शेख अहमद, पत्रकार रत्नाकर महाबळे, पत्रकार विलास सावळे, पत्रकार विजय सावकार चनावार, पत्रकार विनोद महाबळे, पत्रकार जगदीश कदम, पत्रकार इमाम लदाफ, पत्रकार प्रविण महाबळे, पत्रकार बालाजी ढवळे,रहाटकर न्यूज पेपर चे संचालक भागवत सावकार रहाटकर, माजी नगरसेवक उत्तम महाबळे, आदी ने माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांचे शाल पुष्पहार घालून भव्य स्वागत केले.
तसेच निळा येथील उपसरपंच गजानन मोरे, सुनेगावचे स्वप्नील जाधव, संदीप जाधव , सुनिल बोईनवाड यांच्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते यांनी माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक शरद पाटील पवार यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
तसेच बेरळी येथील रंगनाथ ढेंबरे, अकबर सय्यद, सरपंच संदिप होळगे , सुरेश ढेंबरे, आदी ने माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांचा जंगी स्वागत केले .
तसेच कारेगावचे कपिल किरवले, सरपंच हनुमंतराव मुलुकवाडे मंगल किरवले, आदी ने सत्कार केला.
लोहा येथील चेअरमन दत्ता पंदलवाड, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते गंगाधर महाबळे, रेशमाजी दांगटे, गोवर्धन पवार, पिंटू दांगटे, भूषण दमकोडवार, गजानन कळसकर, यांनी ही उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांचा भव्य सत्कार केला.
तसेच लोहा तालुका काँग्रेसचे कोषाध्यक्ष शिवाजी आंबेकर, माजी नगरसेवक चंद्रकांत नळगे, माजी नगरसेवक उत्तम महाबळे यांच्या सह लोहा शहर व तालुक्यातील अनेक मान्यवरांनी माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.