
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर – लासुर स्टेशन येथील आठवडे बाजारात विकण्यासाठी आणलेला बैल चोरी गेल्याची घटना दिनांक 19जुन रोजी दुपारी साडे आकराच्या सुमारास घडली.
बाबरगाव तालुका गंगापुर येथील युवा शेतकरी रविकांत पुंजाराम दंडे वय 29 वर्ष हे आपल्या एका बैलाला विक्रीस लासुर स्टेशन येथील आठवडे बाजारात घेऊन गेले होते.साडे अकराच्या सुमारास बैल दावणीला बांधून पाणी पिण्यासाठी बाजूला गेले तेवढ्यात नजर ठेवून असलेल्या चोरट्यानी 24 हजार रु किंमतीच्या बैलाला घेऊन धूम ठोकली, पाणी पिऊन आल्यावर दंडे यांचा बैल चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी व त्यांच्या बंधूनी परिसरात पाहणी केली, परंतु तो पर्यंत चोरटे बैल घेऊन पसार झाले होते