
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर / प्रतिनिधी
श्रीराम प्राथमिक आश्रम शाळा चिंचोली-अतनूर ता.जळकोट शाळेतील सह शिक्षक संजय गोपाळराव गव्हाणे-पाटील वय ४९ वर्ष यांचे दि.२० सोमवार रोजी पहाटे दीर्घकाळ आजाराने निधन झाले. त्याच्यावर सोमवारी दुपारी अतनूर येथील त्याच्याच शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, ५ भाऊ माजी उपसरपंच बालाजी ऊर्फ राजेंद्र गव्हाणे-पाटील, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अरविंद गव्हाणे-पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजय गव्हाणे-पाटील, भावजय ग्रामपंचायत सदस्या सौ.लीना विजय गव्हाणे-पाटील, आर्मी देशसेवक माधव गव्हाणे-पाटील असा परिवार आहे. तसेच संजय गव्हाणे-पाटील हे भाजपा पक्षाचे स्थापना पासूनच अतनूर शाखाध्यक्ष होते. तर अतनूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.चे नुतन चेअरमन राजेंद्र गव्हाणे-पाटील व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक साहेबराव पाटील, दिलीपराव पाटील, श्रीधर पाटील यांचे चुलत भाऊ होते.