
दैनिक चालू वार्ता आटपाडी प्रतिनिधी-दादासो वाक्षे
आटपाडी –
आटपाडी तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेने काढली होती.म्हणून शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. दिलेल्या इशाऱ्यानुसार आज विभूतवाडी ता. आटपाडी येथील शेतकरी संघटना व शेतकरी यांनी सकाळपासून विकास सोसायटीच्या समोर ठिय्या मारला होता. सायंकाळी चारच्या दरम्यान वसुली विकास सोसायटी कार्यालयात आले काही वेळ सोसायटी मध्ये बसून संचालक व सचिवाशी चर्चा केली पण पण आंदोलकांशी व शेतकऱ्याची कोणतीही चर्चा केली नाही
बँकेचे धोरण काय आहे व शेतकऱ्यांचे व शेतकरी संघटनेचे म्हणणे काय आहे यावर बँकेच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही चर्चा केली नाही त्यामुळे बँकेचे व सोसायटीचे आम्ही काही देणे-घेणे नाही असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गणेश जुगदर यांनी मांडले
शासनाने 2017 व 2019 मध्ये कर्जमाफी केली होती या कर्जमाफी मध्ये अनेक शेतकरी कर्ज माफीत बसत असून सुद्धा 2017 व 2019 मध्ये कर्जमाफीत जाणूनबुजून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ सोसायटीने होऊ दिला नाही तर काही अधिकाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी बसले नव्हते तर त्या काही अधिकाऱ्यांच्या कुचकामी धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी बसवले नव्हते तर त्या शेतकऱ्या वरती जप्तीच्या नोटिसा काढल्या होत्या या जप्तीच्या नोटिसा ला उत्तर म्हणून शेतकरी संघटनेने विरोध दर्शवला होता व आंदोलनाचा इशारा दिला होता
आज ठरल्याप्रमाणे शेतकरी संघटना व शेतकरी विकास सोसायटी च्या समोर सकाळपासून ठिय्या मारून होते सायंकाळी अधिकारी वसुलीसाठी आले असता शेतकऱ्यांबरोबर किंवा शेतकरी संघटनेबरोबर कोणतीही चर्चा न करता विकास सोसायटीच्या शेतकऱ्या बरोबर किंवा शेतकरी संघटने बरोबर कोणतीही चर्चा न करता विकास सोसायटीच्या कार्यालयांमध्ये बसून होते त्यानंतर तिथून ते निघून गेले.
यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गणेश जुगदर म्हणाले की शेतकऱ्या बरोबर किंवा शेतकरी संघटना बरोबर कोणतीही चर्चा केली नाही याचा अर्थ बँकेचे किंवा सोसायटीचे आम्ही कोणतीही देणे-घेणे लागत नाही असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी मांडले
यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गणेश जुगदर आवळा चे अध्यक्ष विलास साळुंखे, अध्यक्ष विलास साळुंखे, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब कदम, कार्याध्यक्ष शंकर कदम ,खजिनदार नवनाथ साळुंखे, सचिव बाबुराव पवार ,उपाध्यक्ष शिवकुमार साळुंखे,व दत्तू मोठे व राहुल मदने उपस्थित होते