
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
औरंगाबाद : ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनतर्फे शहरातील मोबाईल रिटेलर्सच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात २९७ अशा मोठ्या प्रमाणात व्यवसायीक व इतर रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे ऊद्घघाटन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पैठणगेट, पुंडलीकनगर , रांजणगाव या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न झाले. याप्रसंगी मोबाईल विक्रेते व व्यवसायीक बांधव व्यवसाय करंताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे मोठे काम करत आहे. व्यवसायीक करत असुन वेळप्रसंगी मदतीचा हात देखील पुढे करतात. समाजात रक्तदान चळवळीचद्वारे रक्ताचे नाते तयार करण्याचा ऊपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.
यावेळी ज्ञानेश्वर खर्डे अप्पा यांनी आपण केलेले रक्तदान एखाद्याला जीवदान देते, यापेक्षा दुसरा आनंदच नाही. सदरील रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यामागे ॲमराचे राष्ट्रीय महासचिव भावेश सोळंकी यांचा स्मरणार्थ घेतल्याचे गुलाम हक्कानी यांनी मनोगत व्यक्त केले. शहरात दिवसभर चाललेल्या या शिबिरात २९७ रक्त पिशव्या संकलित केल्या. यावेळी शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी,माजी नगरसेवक विरभद्र गादगे, विकी तनवाणी, संग्राम वारेकर, वरूण दुबे, आदित्य मालीवाल, अनुज अग्रवाल, उपशहरप्रमुख शिवा लुगारे, शाखाप्रमुख बद्रिनाथ ठोंबरे, देविदास रूचके, विजय कल्याणकर उपस्थीती होते. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी आयोजक गुलाम हक्कानी , ज्ञानेश्वरअप्पा खर्डे, नवनीत पटेल, इदरचंद दयालानी, हरीष हनफी, लक्ष्मण यादव , अब्दुल कदिर, धरम सुराणा, मयुर तोतला, समीर शिवाणी, सागर महाजन, अनिल काथार, लोकेश होत्ते, मुनाफ खान, शेख सलीम, जयेश चामुंडा, शेख कयुम, शेख इमरान, मुर राऊतराय, ज्ञानेश्वर उपरे यांनी परीश्रम घेतले. रक्त संकलनासाठी ब्लड बॅक, लोकमान्य ब्लड बॅक, लायन्स ब्लड बॅक यांनी सहकार्य केले.