
दैनिक चालू वार्ता पुणे शहर प्रतिनिधी- विशाल खुणे
(किरकिटवाडी पुणे दि . 20 जून )
एकीकडे नालेसफाईचा बोजवारा करून चक्क नाल्याच्या नैसर्गिक पाणी प्रवाहाला सिमेंट ऐवजी माती मुरमाची मलमपट्टी करून रस्ता तयार केला आहे त्यामुळे तुरळक पाऊस पडला तरी त्यातून माती मुरुम सगळं वाहून जाणार नैसर्गीकहानी, मनुष्यहानी होणार यात काही शंका नाही याची खंत वाटते. असे काही घडण्याच्या आधी दुरुस्ती करून घ्यावी आणी या सर्व प्रकरणात अधिकारीवर्ग हे लक्ष देतील अशी अपेक्षा किरकिटवाडी चे मा. ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब हगवणे, अविनाश हगवणे व संतोषभाऊ रिंढे तसेच ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे . हे प्रकरण ताबडतोब मार्गी लावावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे जनसेवक संतोष रिंढे म्हणाले .