
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
भाजपाचे लोहा तालुकाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शरद पाटील पवार यांनी भाजपाला रामराम ठोकून जय हो चा नारा देत मुंबई येथे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना अशोकराव चव्हाण व आ. अमरनाथ राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षा मध्ये जाहीर प्रवेश करुन लोहा तालुक्यात भाजपा ला मोठे खिंडार पाडले असुन शरद पाटील पवार हे आज दिनांक २०जून रोजी लोहा शहरात येताच त्यांचे काँग्रेसचे कोषाध्यक्ष शिवाजीराव आंबेकर यांच्या वतीने काँग्रेसची दस्ती, पुष्पहार घालून पेढा भरवून जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे कोषाध्यक्ष शिवाजीराव आंबेकर, माजी नगरसेवक बाबुभाई कुरेशी, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील नळगे, माजी नगरसेवक उत्तम महाबळे, हळदवचे तंटामुक्तीचे अध्यक्ष किशनराव पाटील कदम, शेख आदी उपस्थित होते.