
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
पत्रकारिता क्षेत्रामध्ये गेली ४५ वर्ष अहोरात्र सेवा देणारे गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांना न्याय मिळवून देणारे पत्रकारांना वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य करणारे लोहा व कंधार तालुक्यातील सर्वात जेष्ठ पत्रकार म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे यांच्या ७२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून म.रा. मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष केशव पाटील पवार यांच्या वतीने लोहा येथे शाल, टोपी, घालून व केक कापून भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, नगरसेवक नारायण येलरवाड,पत्रकार डी.एन.कांबळे, पत्रकार शेख मुरतुजा, पत्रकार विलास सावळे, पत्रकार विजय सावकार चनावार, पत्रकार शिवराज दाढेल, रहाटकर न्यूज पेपर एजन्सी चे संचालक पांडूरंग उर्फ संजय सावकार रहाटकर,छायाचित्रकार विनोद महाबळे,आदी उपस्थित होते