
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा–
लवकरच अंतिम एफ आर पी जाहिर करणार
माजी मंत्री मांजरा परिवाराचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांची माहिती
उदगीर / प्रतिनिधी
दि. २०.
राज्यात सहकारी साखर कारखानदारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या मांजरा साखर परिवाराने चालु हंगामात गाळप केलेल्या परिवारातील मांजरा, रेणा, विलास, जागृती, ट्वेंटी वन, मारुती, विलास साखर युनिट २ या सात साखर कारखान्या च्या माध्यमातून चालू हंगामात ५६. ८० लाख मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करून उस उत्पादक शेतकऱ्यांना २४००/ रूपये मेट्रिक टन प्रमाणे आतापर्यंतच्या एफ आर पी प्रमाणे एक हजार तीनशे त्रेसस्ट कोटी, वीस लाख रुपये अदा करण्यात आल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री तथा मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांनी दिली आहे दरम्यान लवकरच अंतिम एफ आर पी जाहिर करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले
यावर्षी चालू हंगामात विक्रमी गाळप करून मांजरा साखर परिवाराने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणावर आधार देण्याचे काम केले आहे सुरवातीला गाळप हंगामात पावसाने हजेरी लावली त्यामुळें साखर कारखाने उशीरा सुरु झाले तर दुसरीकडे अतिरीक्त उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्याने अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असताना मांजरा साखर परिवाराने जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यानी नियोजन केले पारदर्शकता ठेवून शेतकऱ्यां चा उस गाळप झाला पाहिजे यासाठी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री ना अमित देशमुख,जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व उसाची लागवड झालेल्या नोंदीची माहिती घेवून त्या त्या तालुक्यात यंत्रणा लावून अधिक क्षमतेने कारखाने चालवून जिल्ह्यातील उस उत्पादक सभासद व बिगर सभासद यांच्या सर्व उसाचे गाळप केले आहे त्यामूळे जिल्ह्यांतील उस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे
जो शब्द दिला होता त्याची पूर्तता मांजरा परिवाराने करून दाखवली
जिल्ह्यात मोठया प्रमाणावर उसाची अतिरीक्त लागवड झाल्याने उस उत्पादक शेतकऱ्यांना चिंता वाटत होती मात्र दिलीपराव देशमुख साहेब यांनी उसाच्या गाळपाची काळजी करू नका सगळ्यांचा उस गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद होणार नाही असा शब्द उस उत्पादक शेतकऱ्यांना दिला होता दिलेल्या शब्दाची पूर्तता केली आहे त्यामुळे जिल्ह्यांतील शेतकरी सभासदांत आनंदाचे वातावरण पसरले आहे जो शब्द नेते बोलतात ते करतात हीचं परंपरा मांजरा साखर परिवाराची राहिलेली आहे
विक्रमी उसाचे गाळप १ हजार तीनशे त्रेसस्ट कोटी वीस लाख रुपये अदा
माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यांतील सर्व साखर कारखाना प्रशासनास त्या त्या तालुक्यात उस गाळप करण्यासाठी मोठया प्रमाणावर यंत्रणा लावन्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार अधिक क्षमतेने कारखाने चालवून जिल्ह्यातील सर्व मांजरा परिवारातील ७ साखर कारखान्यानी ५६ .८० लाख मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करून आतापर्यंत एफ आर पी प्रमाणे तब्बल एक हजार त्रेसस्ट कोटी वीस लाख रुपये उस उत्पादक गाळप झालेल्या शेतकऱ्यांना २४००/ रूपये प्रमाणे अदा करण्यात आले आहेत विक्रमी गाळप करून मोठया प्रमाणावर उसा च्या आतापर्यंत एफ आर पी प्रमाणे १३६३२०००,०००/ कोटी (एक हजार तीनशे त्रेसस्ट कोटी २० लाख रुपये) इतकी मोठी रक्कम अदा करणारा राज्यातील साखर कारखानदारीत कदाचित मांजरा साखर परिवार पहिला असेल