
दैनिक चालू वार्ता परतूर प्रतिनिधी -नामदेव तौर
परतूर :शनिवार रोजी परतूर येथे लॉयन्स क्लब ऑफ परतूर च्या नविन कार्यकारणी ची निवड प्रक्रिया पार पडली यात अध्यक्ष पदी लॉ. डॉ. संदीप आसारामजी चव्हाण, सचिव लॉ. प्रशांत राखे तर कोषाध्यक्ष पदी लॉ. बबनराव उन्मुखे यांची निवड करण्यात आली
या वेळी इंस्टॉलिंग ऑफिसर एम. जे. एफ. लॉ. अतुलजी लड्डा ( रिजनल चेअरपर्सन २०२१-२२), इंडक्शन ऑफिसर लॉ.एम जे एफ सुनिलजी बियाणी ( रिजनल चेअरपर्सन २०२२-२३) , लॉ. ऍड. दर्शन कळमकर ( झोन चेअरपर्सन २०२२-२३) , एम. जे.एफ. लॉ. डॉ. दत्तात्रय नंद आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नविन सदस्यांना गोपनीयतेची शपथ यावेळी देण्यात आली
झोन चेअपर्सन लॉ. डॉ. दत्तात्रय नंद व अध्यक्षा संजीवनी खालापुरे यांनी मागील वर्षाचा लेखाजोखा सादर केला.
या प्रसंगी माजी अध्यक्षा सह माजी सचिव लॉ. तारा उन्मुखे, मा. कोषाध्यक्ष लॉ. शिल्पा होलाणी, समन्वयक लॉ. महेश होलाणी, लॉ. विश्वंबर बहिवाळ, लॉ. संदिप दाभाडे आदींसह परतूर शहरातील सर्व लॉयन्स सदस्य यावेळी उपस्थित होते.