
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
भोर (नसरापूर)- कुलदीप तात्या कोंडे युवा विचार मंच यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी “नव्या आशा, नव्या दिशा, मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. वक्ते म्हणून करिअर सेवा डॉट कॉम चे सहसंचालक प्रा. विजय नवले यांचे व्याख्यान संपन्न झाले. व भोर वेल्हे मधील विशेष नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थी व खेळाडूंचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कुंभारकर मंगल कार्यालय, नसरापूर येथे कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम घेण्याचा उद्देश एकच होता तो म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थीना आपल्या करियर साठी नवी दिशा मिळावी व त्यांना एक नवा मार्ग दिसावा.
हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे या आठ अक्षरी नावाची जादू मराठी मनावर तब्बल 55 वर्षाहून अधिक काळ गारुड करून राहिली, आणि इथून पुढे देखील राहील
शिवसेनेच्या 56 व्या वर्धापनदिनी सर्व शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या. हा वर्धापनदिन शिवसेनेसाठी ऐतिहासिक आहे, असे नमूद केले.
या प्रसंगी पुणे जिल्हा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे, भोर पंचायत समितीचे मा. उपसभापती अमोल पांगारे, पुणे जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे,भारतीय कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस गणेश धुमाळ, पुणे जिल्हा युवासेनेचे समन्वयक आदित्य बोरगे, भोर तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख हनुमंत कंक, भोर तालुका युवा सेनेचे प्रमुख अमित गाडे ,पुण्याचे वास्तुविशारद प्रदीप पेठे, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते विद्यार्थी, महिला व तरुण वर्ग,पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार यांनी केले