
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- कवी सरकार इंगळी
मराठी साहित्य संशोधन परिषद आयोजित भिमथडी मराठी ग्रामीण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संमेलन पार पडले. दोन दिवशीय संमेलनात नामवंत साहित्यिकांनी हजेरी लावली होती.
संमेलनाचे अध्यक्ष पत्रकार,साहित्यिक, दशरथ यादव यांनी भूषवले.तर स्वागताध्यक्ष राजाभाऊ तांबे हे होते.निमंत्रक तानाजी केकाण,प्रमुख बाळूमामाच्या नावानं चांगभल फेम कलाकार रमाकांत सुतार, महेशदादा पासलकर पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख, वासुदेव नाना काळे प्रदेशध्यक्ष किसान मोर्चा,डा,अभिनव देशमुख अधीक्षक ग्रामीण पोलिस पुणे.,संयोजक संजय सोनवणे,दिपक पवार,रविद्र खोलकर,कैलास शेलार अशोक जाधव,रामभाऊं नातू,बाळासाहेब मुळीक, संजय गायकवाड,राजू झेंडे,सुशांत जगताप,व सर्व संमेलन कमिटी ग्रामस्थ यांचे उपस्थित ग्रंथ पजून दिंडी काढणेत आली.
संमेलनाचे अध्यक्ष दशरथ यादव यांनी साहित्यिकांनी माणसाची जीवनशैली मांडणारे सकस लेखन करताना ते तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे असे सांगितले. संमेलनात मान्यवरांचे विचार रसिकांना ऐकायला मिळे.
दुसऱ्या सत्रात लोककला जोपासताना लावणी नृत्य आयोजित केले होते.त्यामध्ये न्यू अंबिका कला केन्द्र चौफुला वाखारी येथील कलाकारानी लावणी नृत्य करून साहित्यिकांची मने जिंकली.तर तिसऱ्या सत्रात दौंड तालुक्याच्या विकासाची दिशा व कृती या विषयावर परिसंवाद घेणेत आला.
चौथ्या सत्रात बबन धुमाळ यांचे अध्यक्षखाली व सुत्रसंचलन रानकवी जगदीप वनशिव यांचे उपस्थित बहारदार कविसंमेलन पार पडले.संमेलनात प्रबोधनी न्यूज उपसंपादिका सौ,आम्रपाली धेंडे,कवी सरकार इंगळी, योगीता कोठेकर,लता चव्हाण सातारा,चंद्रकांत निफाडे,सुवर्णा वाघमारे,आप्पा शिंदे,चंद्रकांत चाबुकस्वार,चंद्रकांत जोगदंड पुणे,आनंद गायकवाड,बाळासाहेब गिरी,गोरख पालके नाशिक,गौरव पौंडे,सिमा दरेकर ,तृप्ती शिंदे,आदिनी आपल्या रचना सादर करून साहित्यिकांची मने जिंकली.तर संमेलनात अनेक साहित्यिक, सामाजिक, यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.विष्णू खराडे यांनी आभार संशोधन चौफुला केडगाव परिसरातील सर्व प्रत्रकार बंधूनी एकत्रीत येऊन संमेलन यशस्वी केले.