
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोथरुडमधील वृत्तपत्र व दूध वितरकांना २००० रेनकोटचे वाटप
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोथरुडमधील वृत्तपत्र आणि दूध वितरकांना सस्नेह भेट देऊ केली असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्र आणि दूध वितरकांना दोन हजारापेक्षा जास्त रेनकोटचे वाटप केले.
या वाटपावेळी भाजपा संस्कृतिक आघाडीचे प्रदेश प्रमुख शैलेश गोजमगुंडे, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, माजी नगरसेविका हर्षाली माथवड, अल्पना वर्पे, नगरसेवक जयंत भावे, पुणे शहर भाजपा सरचिटणीस दीपक पोटे, चिटणीस अनिता तलाठी, कोथरुड मंडल सरचिटणीस श्रीधर मोहोळ, दिनेश माथवड, विठ्ठल (आण्णा) बराटे, अनुराधा एडके, गिरीश भेलके, उपाध्यक्ष राज तांबोळी, राहुल कोकाटे, लहू बालवडकर, रुपेश भोसले, युवा मोर्चाचे गणेश वर्पे, अभिजीत राऊत, दीपक पवार, स्वप्नील राजीवडे, कुणाल तोंडे, महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे, सांस्कृतिक आघाडीचे सुचित देशपांडे, आशुतोष वैशंपायन, ओबीसी आघाडीचे विजय राठोड, अजित जगताप, विशाल रामदासी, विवेक मेथा, जगन्नाथ कुलकर्णी, सचिन दळवी, अभिजीत ठाकूर यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील दरवर्षी आपला वाढदिवस दरवर्षी लोकोपयोगी उपक्रमाद्वारे साजरा करतात. गेल्या वर्षी रिक्षा चालकांना कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी एक हजार रुपये किमतीचे सीएनजीचे कुपन वाटप; तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील नागरिकांचे मोफत लसीकरण केले होते.
यावर्षी आ. पाटील यांनी वृत्तपत्र वितरक आणि दूध वितरकांचे पावसापासून संरक्षणासाठी व्हावे, यासाठी रेनकोट वाटप करण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी आपल्या वाढदिवसानिमित्त हार, तुरे नको! वृत्तपत्र आणि दूध वितरकांना रेनकोट आणि घरकाम करणाऱ्या ताईंसाठी छत्री वाटपासाठी आर्थिक योगदान देण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्याला अनुसरून अनेक कार्यकर्त्यांनी आपले योगदान दिले होते. त्यानंतर लोकसहभागातून वृत्तपत्र वितरक आणि दूध वितरकांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. कोथरुडमधील जवळपास दोन हजारापेक्षा जास्त वृत्तपत्र आणि दूध वितरकांनी याचा लाभ घेतला.
दरम्यान, उद्या दिनांक २१ जून २०२२ रोजी कोथरुडमधील रिक्षाचालकांनाही रेनकोटचे वाटप करण्यात येणार आहे. दुपारी १२ ते ५ या वेळेत आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड मधील जनसंपर्क कार्यालयात याचे वाटप करण्यात येणार असून, यासाठी रिक्षाचालकांनी आधार कार्ड आणि वाहन कागदपत्रे घेऊन जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून, याचाही लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.