
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी – भरत पवार
भाजपाचे लोहा तालुकाध्यक्ष तथा माझी उपनगराध्यक्ष शरद पाटील पावार यांनी भाजपाला रामराम ठोकून जय हो चा नारा देत मुंबई येथे कॉंग्रेस पक्ष्याचे जेष्ठ नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना अशोकराव चव्हाण व आ. अमरनाथ राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉंग्रेस पक्ष्यां मध्ये जाहीर प्रवेश करून लोहा तालुक्यात भाजपला मोठे खिंडार पाडले असून शरद पाटील पवार हे आज दिनांक 20 जून रोजी लोहा शहरात येताच त्यांचे माझी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे सरचिटणीस शहेबाज शेख यांच्या वतीने पुष्पहार घालून पेढा भरवुन जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे सरचिटणीस शहेबाज शेख, माझी नगरसेवक अनिल दाढेल, माझी नगरसेवक उत्तम महाबळे भूषण दमकोंडवार युवा उद्योजक गजू कळसकर, गुड्डू पटेल, आमिर शेख, रियाज शेख, शकील शेख, विक्रांत नळगे आदी उपस्थित होते.