
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:19 जून 2022
पूर्ण जगभरात कोरोना महामारी ने तांडव घातले असताना, जीवाची पर्वा न करता , कुटुंब पासून दूर राहून, अख्खं जग कोरोना ला घाबरून घरात बसत असताना , रुग्ण सेवा हीच देश सेवा मानून कोरोणा विरुद्ध लढाईत ज्यांनी लोकांचे प्राण वाचवले ते म्हणजे डॉक्टर्स आणि नर्सेस.
मुंबई सह पूर्ण महाराष्ट्रात कोरोना ने मृत्यू तांडव करत करते वेळी जळगाव चा मृत्यू दर भयानक वाढल्याने जे. जे. हॉस्पिटल मुंबई हून डॉ. मधुकर गायकवाड यांना मृत्यू दर कमी करण्यासाठी तिथे पाठवण्यात आले आणि त्यांनी ते करून दाखवले. या पेक्षा ही पलीकडे लोकांना औषध मिळून देण्यापासून ते 24 तास फोन वर लोकांना स्वतःला उपलब्ध करून दिले. एवढेच नाही तर देशातील व बाहेर देशातील लोकांना सुध्दा त्यांनी मदत केली.
या त्यांच्या उत्तम कामगिरी बद्दल काल दिल्ली येथे पंचतारांकित हॉटेल मध्ये नवोदय फॅमिली कडून पूर्ण महाराष्ट्रातून फक्त एकाच व्यक्तीला म्हणजेच डॉ. मधुकर गायकवाड यांना “Worldwide-Corona Warrior” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही पूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.
या कार्यक्रमाला फक्त दिल्ली न्हवे तर पूर्ण भारतातून विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदावर कार्यरत असलेले नवोदय चे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
अशी माहिती JAAM संस्थे चे कुलदीप पिल्लेवाड यांनी दिली.