
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -गोविंद पवार
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नांदेड जिल्हा सरचिटणीस व नांदेड शहर जिल्हाध्यक्ष (सोशल मिडिया) काँग्रेस हरजिंदर सिंघ संधू यांनी लोहा येथे सत्कार करण्यात आला.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नांदेड जिल्हा सरचिटणीस व नांदेड शहर जिल्हाध्यक्ष (सोशल मिडिया) काँग्रेस हरजिंदर सिंघ संधू यांनी लोहा येथे आले असतांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार यांच्या आग्रहात्सव उपाध्यक्ष कहाळेकर यांच्या संपर्क कार्यालयाला तथा कहाळेकर प्रतिष्ठान ला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवासंघाचे लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार, उपाध्यक्ष तथा दैनिक सत्यप्रभा चे तालुका प्रतिनिधी संजय कहाळेकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा सरचिटणीस हरजिंदर सिंघ संधू यांचा सत्कार करण्यात आला.