
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : हिरवा झेंडाही दाखवला – त्यांनी विजेवर चालणार्या गाड्यांना हिरवा झेंडाही दाखवला. हिरवा झेंडा दाखवल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील सहा स्थानकांवरुन विजेवरील इंजिन जोडलेल्या मालवाहतूक गाड्यांचा प्रवास सुरु झाला. रत्नागिरी स्थानकावरुन विद्युत इंजिन जोडलेली मालगाडी मडगावच्या दिशेने रवाना झाली. या कार्यक्रमाची औपचारीकता रत्नागिरीत करण्यात आली. कोकण रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे स्थानकावरील पहिल्या फलाटावर मंडप टाकून मोठी स्क्रिन उभी केली होती.
विद्युतीकरणाच्या लोकार्पणानंतर कार्यक्रमाला उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी घोषणा देत आनंद व्यक्त केला. विद्युतीकरणाचे काम पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांच्यासह रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी कोकण रेल्वेच्या कामगिरीचे कौतुक केले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना पंतप्रधान म्हणाले की, विद्युतीकरणासारख्या महत्त्वाच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, लोकार्पणाचा साक्षीदार बनण्याची संधी मला मिळाली. भारतीय रेेल्वेच्या सात प्रकल्पाचा फायदा युवक, शेतकरी, मध्यम वर्ग यांच्यासह उद्योजकांना नव्या सुविधांच्या रुपाने मिळणार आहे. नवीन संधी उपलब्ध होतील असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला व्यासपिठावर अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपविभागिय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, कोकण रेल्वेचे विभागिय व्यवस्थापक रविंद्र कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, मिरजोळे सरपंच गजानन गुरव यांच्यासह भाजपचे जिल्हाधिकार अॅड. दिपक पटवर्धन, अॅड. बाबासाहेब परुळेकर, सचिन वहाळकर आणि अनेक भाजपचे कार्यक्रर्ते उपस्थित होते.