
दैनिक चालू वार्ता धाड सर्कल प्रतिनिधी-.सलमान नसीम अत्तार
चांडोळ. समाजात जाती सलोखा प्रस्थापित करण्यासाठी सर्वधर्म संभावनातून ऐकतेचा संदेश देण्यासाठी, जामा-मस्जिद ट्रस्ट चांडोळ व मुस्लिम युवकांनी सर्वधर्मीय नागरिकासाठी ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रमाचे आयोजन करून समाजात एक आदर्श निर्माण केला.
या कार्यक्रमात दर्यापूर येथील मुफ्ती जुनेद साहब व मोहम्मद इशतीयाक सर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रम मध्ये सर्वाना अजानचा काय अर्थ? नमाज कशी पठण केली जाते हे पण दाखविण्यात आले.
काही लोकांना असा गैर समज आहे कि अजान मध्ये जे अल्लाहू अकबर म्हटले जाते त्यात अकबर बादशाह जे मुघल बादशाह होता त्या बद्दल बोलतात पण मुफ्ती जुनेद साहब यांनी याचे खंडण केले व अल्लाह हुअकबर या शब्दाचा योग्य महोत्व सांगितले. (ईश्वर सर्व शे्रेष्ठ आहे आणि ईश्वर सर्वात मोठा आहे हे आहे आलहुअकबर चा अर्थ.
या नंतर मोहम्मद इस्तियाक सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि सर्व मानवजाती एकच ईशवराची संतान आहे.म्हणून आपण सर्वानी एकत्र राहून समाजात एक आदर्श निर्माण करावा.
गोर गरीबाची मदत करावी, शेजारी धर्म, दानधर्म करावे व सरड हाताने मदत करावी,
कार्यकर्माचे सूत्र संचालन हाजी मोहम्मद शाहेद सर केले तर प्रकाश देशमुख भानुदास राऊत, पोलीस पाटील पंकज देशमुख सर्वांचे कौतुक केले व असेच कार्यकर्माची आज समाजात गरज आहे सांगितले.
ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रमात सर्वधर्म्मीय नागरिकांनी सहभागी होऊन कार्यकर्माची शोभा वाढविली.
कार्यक्रम संपल्या वर मुस्लिम युकांनी सर्व नागरिकां साठी शीरखुर्मा चा आयोजन केला होता.
मस्जिद परिचय कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मस्जिद ट्रस्ट व युकांनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.