
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा : – पारवा येथील अनुसया इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा करण्यात आला.
योगा नियमित केल्यास आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. आरोग्य निरोगी राहण्यासाठी योगा हा नियमित करावा असा संदेश या योगादिना निमित्ताने अनुसया इंग्लिश मेडियम स्कुलच्यावतीने विद्यार्थ्यांना देण्यात आला.
अनुसया इंग्लिश मेडियम स्कुलचे संचालक प्रा. मारोती लोखंडे यांनी मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देणे, त्यांचा सर्वांगीण विकास करणे, त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुयोग्य अभ्यासक्रम, गुणवत्ता असलेले निष्ठावंत शिक्षक, आदर्श पायाभुत सुविधा, असे अनेक उपक्रम घेण्याचा प्रयत्न केला असुन काही दिवसांतच शाळेचं परीसरात नावलौकिक पहावयास मिळत असल्याचे दिसून येत आहे.
या योगादिनाला शाळेतील विद्यार्थी मुख्याध्यापिका कुलकर्णी , सहशिक्षक कऱ्हाळे , व चिकाळे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना योगाविषयी महिती व योगासने करून घेण्यात आली.