
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा- आपसिंग पाडवी
गृप ग्रामपंचायत कात्री येथे डाॅ. हेडगेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत हवामान बदलावर कश्या प्रकारे मात करून शेतकरी बांधवांनचे शेती उत्पादनावर कशी वाढ करता येईल यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमात विविध शेती निगडीत विषयावर काम करण्यासाठी आज पासून पुढील तिन वर्षापर्यंत काम करण्यासाठी निक्रा प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुकदेव माळी होते यावेळी संदिप वळवी यांनी बीज प्रक्रियेसंदर्भात प्रात्यक्षिक ,झेबा जलशोधक पदार्थांचा संदर्भात सत्यवान गिरासे,किशोर गिते यांनी प्रात्यक्षिक सादर केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत उत्तरवार यांनी केले कार्यक्रमात यु डी पाटील यांनी खरीप पिकांचे नियोजन व पीक उत्पादन यावर, पदमाकर कुदे यांनी बीज प्रक्रियेचे महत्व आणी पीक संरक्षण यावर,उमेश शिंदे यांनीही मार्गदर्शन केले
तसेच विविध जातीचा जास्त उत्पादन मिळवून देणार्या ज्वारी,मका,राळा,बाजरी,तूर,बियाण्याचे तसेच बिजप्रक्रीयेसाठी लागणारे जैविक खते पाणी धरून ठेवण्याची लागणारे जैविक खते ही यावेळी वाटप करण्यात आले. कार्यक्रमास शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते