
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-राजेश गेडाम
भंडारा:सनिज स्प्रिंग डेल शाळेत जागतीक योग दिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कांचनताई ठाकरे प्रमुख अतिथि वंदना खरवडे,प्राचार्या शेफाली पाल होते. तत्पूर्वी योग दिनाची सुरवात विद्येची देवी सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले प्रात्यक्षिक सुरु होण्यापूर्वी प्राचार्या शेफाली पाल यांनी योग दिनाचे महत्व सांगितले त्यांनी आपल्या प्रस्तावनेतून दररोज योगा केल्याने आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतात शरीर आणि मन शांत करण्यासाठी योगा खूप फायदेशीर ठरतो असं मोलाचे मार्गदर्शन केले. यानंतर तज्ञ् मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली योगा करण्यास सुरवात झाली सदर कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्था उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन शाळेतील शिक्षिका ईला चॅटर्जी यांनी केले तर आभार प्रदर्शन संध्या लकडे यांनी केले.