
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर– मंगळवार,दि.21.6.2022 रोजी सकाळी ठिक 7 वाजता जि.प.प्राथमिक शाळा व संत तुकाराम माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय शिंगी शाळेत जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला.या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक श्री.दिलीप आळंजकर सर व मुख्याध्यापक श्री प्रमोद सोनवणे सर यांनी योगा प्रार्थना,योगा गीत,बैठे व उभे योगासने व विविध मुक्त हालचाली मुलांसह सर्वांचे करुन घेवून योगाचे म्हत्त्व पटवून दिले. श्री.रविंद्र जाधव,पत्रकार श्री.सुनिल पा.झिंजुर्डे , दिगंबर वाखूरे, बाबुलाल शेख, पत्रकार इंद्रजित कासार, नायायण कारभार,आप्पासाहेब कारभार,सतिश कबाडे सर,विजयकुमार सोनवणे सर,किशोर भोसले सर,राजाराम कापडी सर,एस एस चव्हाण सर, हरकळ सर,सावंत सर, काकडे सर, बनकर सर, हरिभाऊ चौधरी,जाधव मॅडम, उरणकर मॅडम,विमल इखे मॅडम,सुनिता पवळ मॅडम,अर्चना नरवडे मॅडम,नंदाताई वाघ,योगिताताई जाधव,नसिबाभाभी शेख व मीराबाई चाैधरी हे उपस्थित होते.
शेवटी सर्व उपस्थितांचे सतिश कबाडे सर व सोनवणे सर यांनी आभार मानले