
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
नागपूर : मागील 2 वर्ष वर्षापासून कोविड महामारीमुळे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत 79 व्या फेरीचे सर्वेक्षण रखडले होते परंतू यावर्षी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या वतीनं देशभरात 1 जुलै ते 30 जून 2023 या कालावधीत आयुर्वेद, योग, युनानी, प्राकृतिक चिकित्सा, सिध्द, होमिओपॅथी, या पद्धतीचा आयुष अंतर्गत आणि व्यापक मोड्युलर सर्वेक्षण -सीएमएस या 2 सर्वेक्षणाच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाअंतर्गत येणा-या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय-एन.एस .ओ. नागपूर क्षेत्राचे संचालक श्रीनिवास उप्पला यांनी आज दिली. राष्ट्रीय नमुना सर्वे संघटना- एन.एस.ओ.ओ. च्या 79 व्या फेरीच्या 20 ते 21 जून दरम्यान आयोजित दोन दिवसीय क्षेत्रीय प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन राष्ट्रीय सांख्यकी कार्यालय यांच्या नागपूर क्षेत्रातर्फे इंडियन ब्यूरो ऑफ माइन्स येथील इंदिरा भवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय,नागपूर क्षेत्राचे उपमहासंचालक श्री. आर. सी. गौतम यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असणार्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्यावतीने 1 जुलै 2022 ते 30 जून 2023 या कालावधीत व्यापक वार्षिक मॉड्युलर सर्वेक्षण( कॅम्स) ज्या अंतर्गत संगणक वापरत असलेल्या कुटुंबाची टक्केवारी, माहिती आणि तंत्रज्ञान अवगत असलेल्या कुटुंबाची टक्केवारी आणि तंत्रज्ञान शिक्षण या बद्दलची माहिती संकलित केली जाणार आहे. आयुष सर्वक्षण अंतर्गत आयुष उपचार संबंधी माहीत असलेल्या कुटुंबाची टक्केवारी माहिती संकलित केली जाणार आहे. व्यापक वार्षिक मोड्युलर सर्वेक्षण अंतर्गत प्रथमच जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टं संदर्भात सुद्धा माहिती संकलित केली जाणार आहे. सर्वेक्षण हे टॅबलेट मार्फत होणार असून त्या मधे चुकांची शक्यता नगण्य असल्याची खात्री उपल्ला यांनी व्यक्त केली.
या 2 सर्वेक्षणाची अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून संकलित झालेली माहिती यावरच सर्वेची आकडेवारी जाहीर होणार असून ती सरकारी आणि खाजगी या दोन्ही क्षेत्रात गंभीरपणे विचारात घेतली जात असून आणि संगणक व टॅबलेट प्रणाली वापरून अचूक माहिती संकलित करण्यासाठीच हे शिबिर अत्यंत महत्वाचे असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय,नागपूर क्षेत्राचे उपमहासंचालक श्री. आर. सी. गौतम यांनी सांगितले. नागरिकांनी कोणताही संकोच न बाळगता सर्वेक्षणासाठी खरी माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आले.
राष्ट्रीय नमुना सर्वे संघटना- एन.एस.ओ.ओ. तर्फे संकलित जाणारी माहिती सामाजिक आर्थिक धोरणे , विविध योजना आखण्यासाठी, 2030 चे सतत विकास लक्ष्य साध्य करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाला सहाय्यक ठरते. प्रत्येक नवीन सर्वेक्षण सुरु करण्यासाठी अशा प्रकारचे क्षेत्रीय प्रशिक्षण आवश्यक असते.