
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- बाजीराव गायकवाड
कंधार:- गंगाधर गोविंदराव वडजे राहणार खंडगाव तालुका कंधार जिल्हा नांदेडचा रहिवासी असून त्यांच्या आईस कॅन्सर आजार व त्यांची पत्नी स्लॅबवरून पडून फॅक्चर झाल्याने त्यांच्या उपचारासाठी त्यांच्या हिस्स्याची व त्यांच्या नावाने गेल्या दहा वर्षापासून त्यांच्या ताब्यात असलेली शेत गट क्रमांक 271 मधील 67आर जमीन त्यांनी श्री व्यंकटराव बाबाराव बेतेवाड यांना विक्री केली.त्यांना शेत जमीन मोजून व ताबा देत असते वेळी 1.देविदास 2.संभाजी 3.हानमंत पि.गोविंदराव वडजे यांनी अडवाआडवी करून मा.तहसीलदार साहेब कंधार व मा.तलाठी साहेब सज्जा गोणार यांच्या सेवेत तक्रारी अर्ज दाखल करून जमीन खरेदीदाराच्या नावाने फेरफार लावू नये म्हणून तक्रार दाखल करून गंगाधर वडजे यांना अश्लील शिवागीळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल त्यांनी मा.पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन कंधार यांच्या सेवेत दिनांक 3 जून रोजी गंगाधर वडजे आजारी असल्यामुळे रजिस्टरी मार्फत पोस्टाने तक्रारी अर्ज दाखल करून दिनांक 18 जून पर्यंत दोषी विरुद्ध आपल्याकडून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व गंगाधर वडजे यांना न्याय द्यावा अन्यथा ते नाईलाजास्तव न्याय हक्कासाठी लोकशाही पद्धतीने मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय कंधार जिल्हा नांदेड कार्यालयापुढे बेमुदत आमरण उपोषणास बसण्यात येईल असा इशारा गंगाधर वडजे यांनी दिला.