
दैनिक चालु वार्ता लातूर जिल्हा प्रतिनिधी -प्रा मारोती बुद्रुक पाटील.
भारतीय ऋषिमुनींनी योगाचे महत्त्व पूर्वीपासून सांगितले आहे योग ही भारतीय प्राचीन विद्या आहे ऋषीमुनी जे करत होते आपल्याकडे रामदेव बाबा यांनी त्याचा प्रचार आणि प्रसार खूप मोठ्या प्रमाणात केला योग आपल्या उत्तम प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत भारत भूमिला महान तपस्वी लोकांची भूमी म्हणून ओळखले जाते. ‘योग’ हा या भारत भूमिला मिळालेला वारसा असून ती देशाची एक महत्वाची ठेव आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.आसे प्रतिपादन आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व रोटरी क्लब व योग समितीच्या वतीने योगा दिनाचे औचित्य साधून पोलीस बांधवाची व त्यांच्या कुटुंबीयांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी बलराज मंजिले तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी मुख्य अधिकारी त्र्यंबक कांबळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दासरे डॉ ऋषिकेश पाटील डॉ रामेश्वर रामेश्वर चामले डॉ स्नेहा पाटील डॉ चैतन्या चामले शिवानंद निघणे जि.प. सदस्य माधव जाधव निवृत्ती कांबळे पोलीस निरीक्षक चितांबर कामटे पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक विश्वंभर स्वामी सचिव गजानन भुसारे उपाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड आदींची उपस्थिती होती पुढे बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की
विविध रोगांनी ग्रासलेल्या मानवजातीला ‘करा योग रहा निरोग’ हा मंत्र अगदी संजीवनी समान आहे. शरीरिक व मानसिक आरोग्य प्राप्त करुन देणारी ‘योग’ ही शक्ती मानवी आरोग्याला लागलेल्या रोगांच्या ग्रहणाला दूर सारु शकते. मानव शरीर पंचतत्वांनी बनलेले आहे. यामध्ये जल, वायू, पृथ्वी, अग्नी, आकाश या तत्वांचा समावेश आहे. या पंचतत्त्वांच्या संतुलनामुळेच हे शरीर हे स्वस्थ राहते. योग म्हणजे सुख, शांती, समाधानाने जगण्याची आरोग्य चांगले ठेवणे यासाठी व्यायाम योगा आवश्यक आहे ते महत्त्वाचे आहेत कामाचा प्रचंड ताण असतो त्यामुळे त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे पोलिस यंत्रणेवर खूप मोठा ताण असतो त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे संपत्तीपेक्षा स्वास्थ्य महत्त्वाचे आहे असेही आ बाबासाहेब पाटील म्हणाले.
यावेळी डीवायएसपी मंजिले म्हणाले की पोलिस नेहमी टीकेचे धनी असतात प्रचंड कामाच्या व्यापामुळे आरोग्याकडे स्वतःला लक्ष देता येत नाही अशा शिबीराचा आमच्या कर्मचाऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा विश्वंभर स्वामी यांनी पत्रकार संघाच्या या वाटचालीचा आढावा आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केला
यावेळी 150 पोलिसांचे व त्यांच्या कुटुंबीयांची मोफत सर्वरोग निदान तपासणी करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक विश्वंभर स्वामी केले तर सूत्रसंचालन डॉ बालाजी कारामुंगीकर यांनी केले व आभार शिवाजीराव गायकवाड यांनी मानले या वेळी व्यासपीठावर पत्रकार संघाचे सचिव गजानन भुसारे तालुका समन्वयक बालाजी पारेकर तालुका संघटक बालाजी तोरणे पाटील उदय गुंडीले महादेव महाजन सुरेश डबीर चंद्रकांत शिंदे मासूम शेख मारोती बुद्रुक पाटील आनंद कांबळे संदीप गुंडरे सर पत्रकार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.