
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कलंबर- हनमंत शिरामे
कलंबर ;- कलंबर येथील संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक श्री. मामडे एस. एन. साहेब यांनी योगाविषयी माहिती सांगितली. ते म्हणाले योगा नियमित केल्यास आरोग्यासाठी चांगले असते. आरोग्य निरोगी राहण्यासाठी योगा हा नियमित करावा असा संदेश दिला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. मारोतीराव पाटील घोरबांड यांनी योगाविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच नागेश तुप्पेकर व कर्हाळे सर यांनी योगासने करून दाखवली आणि प्राणायाम, व्यायाम करणे आवश्यक असल्याचे सांगितले.या कार्यक्रमात सहभागी सर्व प्राध्यापक, शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.