
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-पतंजलि योग समिति,तहसिल कार्यालय,नगर परिषद,महात्मा फुले बँक,दैनिक कँलिफोर्निया टाईम्सच्या संयुक्त विद्यमाने गुरुदेव प्रार्थना केन्द्र येथे असंख्य योगसाधकांच्या उपस्थितित मोठ्या उत्साहाने जागतिक योग दिन वरुड शहरात साजरा करण्यात आला.
महात्मा फुले अर्बन बँकेचे अध्यक्ष राजेंद्रजी आंडे अध्यक्षस्थानी होते तर मुख्य अतिथि म्हणुन तहसीलदार गजेंद्र मालठाणे,नगरपालिकेचे प्रशासक व मुख्याधिकारी प्रवीण मानकर,वरुड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रदीप चौगावकर,नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष किशोर भगत,कृषी विद्यापीठाचे संचालक मोरेश्वर राव वानखेडे,डॉक्टर निलेश बेलसरे,नायब तहसीलदार प्रतिभाताई चौधरी,महात्मा फुले बँकेचे व्यवस्थापक मनीष होले,महिला आघाडी प्रमुख माधुरी भगत होते,जागतिक योग दिनाचा कार्यक्रम गुरुदेव प्रार्थना केंद्र याठिकाणी संपन्न झाला गायत्री मंत्र ,ध्यान साधना,सुर्यनमस्कार,योगाचे महत्व गुरुवर्य गिरिधर देशमुख यांनी पटवुन दिले जागतिक योग महोत्सवाचे उद्घाटन महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष राजेंद्र आंडे व प्रमुख अतिथींच्या द्वीप प्रज्वलन करण्यात आले,शहरातील विविध गणमान्य नागरिकांनी या जागतिक योग दिवस महोत्सवात भाग घेतला होता योगगुरु देशमुख यांनी पंधरा वर्षापासून या गावांमध्ये योगचळवळ राबविल्याबद्दल व्यासपीठाच्या वतीने त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला त्यांना स्मृतिचिन्ह भेट करण्यात आले या प्रसंगी अनेकांनी त्यांचे अभिनंदन केलं आणि त्यांनी केलेल्या कार्याची ओळख कृषी विद्यापीठाचे संचालक मोरेश्वर वानखडे यांनी करून दिली तत्पूर्वी आपल्या मनोगतामध्ये बोलतांना महात्मा फुले अर्बन बँकेचे अध्यक्ष राजेंद्र आंडे यांनी या चळवळीला अधिक महत्त्व असून जीवनामध्ये योग हा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले तर तहसीलदार गजेंद्र यांनी योग दिनाचे महत्त्व पटवून दिले नगरपालिकेचे प्रशासन आणि मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांनी नगरपालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन योग्य शिक्षिका विद्यार्थी राऊत यांनी केले या कार्यक्रमात अनेक योग शिक्षक व योग शिक्षिकांचा स्मृति चिन्ह देऊन सत्कार आणि सन्मान करण्यात आला याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि जागतिक योग दिनानिमित्त त्यांनी टी-शर्ट आणि बिस्किट वाटप मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आले वरुड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर,योगशिक्षक गुलाब यावले,प्रकाशदादा बेलसरे,नेहा थोरात यांनी प्रात्यक्षिक करुन दाखविले कार्यक्रमाचे संचाकन योगशिक्षिका विद्याताई राऊत व आभारप्रदर्शन योगशिक्षिका नम्रता साबळे यांनी केले.