
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- भारतीय जनता पार्टी अमरावती शहर व जिल्हा तसेच अंबा मंडळ यांच्या वतीने आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मा.आ.प्रविणजी पोटे उपस्थित होते.तसेच योग दिनानिमित्त आ.प्रविणजी पोटे यांनी योगा केला.यावेळी भाजप शहर अध्यक्ष किरणजी पातुरकर,भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकांना योगाची जाणीव व्हावी यासाठी जगभरात दरवर्षी २१ जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो.संयुक्त राष्ट्र महासभेने मान्यता दिल्यानंतर २०१५ मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.योग दिनाच्या निमित्ताने योगाचं महत्त्व सर्वांना सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.योगामुळे तुम्ही निरोगी राहू शकता,तुमचे मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग खूप उपयुक्त आहे.असे यावेळी मा.आ.प्रविणजी पोटे यांनी म्हटले.